Thursday, May 25, 2006

मांलवणीची कवतिके

येरवा असांच खंयच्याशा विचारात गढलंलय. (तशी सठीसामाशी खोल विचार करूची पद्धत हा आमच्याकडे. ) तितक्यांत दार टकटकलां. आता संवयीन या टकटक्येच्या जातीवरसून भायर कोण इलेला आसा ता ओळखूं येतां. येरवी आपल्या हाश्टेलांत पायान दुसऱ्याच्या दाराक लाथ घालणाऱ्ये झिलगे बाइलमाणसांच्या हाश्टेलात आदबीन टकटक करतंत. जुनी-जाणती चेडवां मूठ आपटतंत नायतर थाप मारतंत (खास मैत्रीतली असतलीं तर व्हरांड्याच्या टोकांसूनच नावाचो उद्धार करूक लागतंत) आणखिन नवीन चेडवां घाबरत घाबरत कडयेक हात लावून ती वाजवल्यासरखां करतंत.
येरवांची टकटक पयल्या जातीतलींशी वांटलीं. विचारांच्या तळयेत भलतांच खोल बुडलंलय, तेवा भायर येईसारख्या वाटूक ना. बसल्या जाग्यारसूनच आरडलंय.."Who's it?" (तशी रागाक इल्यार इंग्रजी बोलूची पण पद्धत हा आमच्याकडे.) तसो आमच्या क्यान्टीनांत काम करतां त्या चेडवाचो दबको आवाज कानार पडलो: "bill." शिरां पडलां त्यांच्या तोंडार तो! कालच मियां बघून आलंलंय..चांगलो दोनशे अडुसष्ठ रुपयांचो ऍडव्हान्स होतो अकाउन्टात. झट्क्यांत उठून दार उघडलंय. एका कागदाच्या चिंधीर वीस-एक लोकांची नावां, आणि फुडे बाकी असलंला बील असा लिहिलंला होतां..आणी माज्या नावाफुडां २६८ येणां बाकी! मालवणी भाशेचा न्यान अशा प्रसंगाक कितक्या म्हत्त्वाचा आसतां तां भायल्ल्यांक कळाचो ना. हो काय तो सगळो प्रकार निस्तारलंय, म्हणतां पुरेतो विचारान डायरेक्शन बदाल्लली.

त्या क्यान्टीनवाल्याक गाळये घातलंय त्या निमितान मालवणीची उजळणीव करून घेवचा मनांत इला. कितक्याशा म्हयन्यान अशी तळकोकणाची बोली आठौन जिवाक बरांसा वाटलां होता मंओ. मगे 'रिकामो सुतार'! हंयसर येवन लिवाक बसलंय.
भाईंच्या 'म्हैशी'तल्यें गांवकरी मांलवणी बोलतनां आयकलंली ती शेवटचीं. घराकडे गेल्यार आवशी-बापाशीवांगडा गम्मत म्हणून बोलतां खरां, पण पाच-स मिन्टाच. आजोळात कुडवाळणींचा बोलणां आयकाक गांवता तितक्या आयकान घेतंय. पण अजूनंय अस्सल बोलयेर मनासरखी कमांड येउक ना. काक्या, वयन्या मालवणी हेल काडतंत पण घर्च्यांशी बोलतंना भाशा मराठीच..शुद्ध म्हणतंत तंसली. वोगीच कधी आपला येखांदा 'नाऽय ओ?' येतां तोंडातसून, पण तां तितक्याच. भिरंडा फोडूक, सोलां (आमसुलां) वाळौक जी बाइलमाणसां येतंत - भीमामामीसरकी (थंयसर तिका म्हणतंत 'भिमडं', आणि हाक मारुची असतली तर 'गो भिमड्या' ) -- त्यांच्यावांगडा मात्र माजी काकी बोलतां मालवणी.
माका पयल्यांदा वाटे कांय, की ही जी बोली कोकणांत बोलतंत तीच कोंकणी. पण तसां ना. कोकणाच्या खाली गोंयच्ये लोक बोलतंत ती कोंकणी. ही आमच्याकडे बोलतंत ती मालवणी. तशे कोंकणीचे मालवणी-कोंकणी, सेंट्रल म्हंजे 'पिवर' कोंकणी, कारवारी-कोंकणी अशे संकरित प्रकारंय आसत. त्यांतलो एक गमतीचो नमुनो (माका वाट्ता कारवारी-कोंकणीचो) 'पु.ल. : एक साठवण' पुस्तकांत मागे येका पत्रांत बघूक गांवतां.
मांलवणी म्हटलां काय घाटवळांका मच्छिन्द्र कांबळी पयलें आठवतलें. (मालवणात तेंका मछगो, कांबळो, शालगो म्हणतंत का ना तां येकदा तपासूक होया.) 'अश्लील भाशा' म्हणान भायल्ले आरड घालतंत, आणि भायर बदनामी करतां म्हणून आंतले दांतओठ खातंत, अश्या दोनंय बाजून कात्रीत सापडूनंय या माणसान 'वस्त्रहरण' चांगलांच फेमस केल्यान. मगे आणखींय खंयची खंयची नाटकां केलीन. आताशां 'वस्त्रहरण' यांच नावान येक मुलाखतीचो कारेक्रम करान टीव्हीवरंय धुमशान घालतासो दिसतो. तां कांयव असलां तरी मूळ नाटक बाकी फर्मास होतां हो. तेतुर्ली नटमंडळी, लेखक - सगळ्यें मुम्बंयच्या कापड-गिरणीतल्यें कामगांर - गांवाकडे 'चाकरमान्यें' म्हणतंत तंसले - होतें म्हंणतंत. दिग्ददर्शन (हो तेतुर्लोच शब्द!) तितक्यां कांबळ्यांचा. कांय येक येक मालवणी म्हण डिकाला तेल लांवतंत तशी वापरलंनी होतीत! 'घरचा मांजार आडवां जाणां' = बायलेन कामात आडकाटी करणां..वा!
लोकां म्हणतंत नाटकांत गाळये घातल्याशिवा येकंय ओळ पुरी जाणंय ना. पण हो थोडो त्या भाशेचो मूळचोच गुणधर्म आसा तेकां आतां कांय करुचा? :) 'वशाड इला त्येका', 'शिरां पडलां', 'फटकीचां इलां दुकणां व्हरान तां' 'मार्ली शेपडी' ह्या गाळया ना. भाशेची चौकट घट करुक ते खिळे असतलें! मालवणी हेलातलो तो खटको या खुंट्यांकच जांवन अटकतां. त्यांचो अर्थ? तुज्या आवशीचो घो, मेल्या..कांय सांगत होतंय कांय मियां इतक्या वेळ?

***

कांही(च) शब्दांच्ये अर्थ:

खंय - कुठे
झिलगा - मुलगा
चेडू - मुलगी
भायल्ले - बाहेरचे
वांगडा - सोबत
भिरंड - कोकमाचे फळ

18 Comments:

गायत्री, बरा वाटला जिवाक तुझा ह्या पोस्ट वाचान्. पण अगो, मालवणी पण बदलता गे दर बारा मैलार. कुडाळकरा 'हडे' म्हणतत आणि आमी वेंगुर्ला - वाडीकडची मंडळी 'हयसर' म्हणतो (इथे/इकडे या अर्थाने). मालवणकरा बोलतंत ती तिसरीच आणि बाणकोटची माका वाटता अजून खंयची तरी. अजून बरेच आसत बारीक सारीक फरक, पण माका ते नीट कळनत नाय. माझी पण घरी बोलूची भाशा मराठी पण आजीशी बोलतंय मालवणीतसूनच. त्यामुळे तसो सराव टिकून आसा. आणि तू म्हणतंय ता खरा आसा - बाकीच्यांका वाटता खरी ही शिव्यांची भाशा, पण तिचा ह्या उपजत वळण समजावून सांगतलंय कोणाक आणि समाजतलो कोण?

-- फक्त 'मालवणी भाशेचा न्यान अशा प्रसंगाक कितका म्हत्त्वाचा आसंय' यात आसंय ऐवजी आसा हवे होते का? छिद्रान्वेषीपणाबद्दल क्षमस्व.

इतिBlogger Nandan
Thursday, May 25, 2006 5:55:00 PM  

ह्या काय, तू तर तळ कोकणात म्हंजे आमच्या शिन्दुदुर्गात पन शिरल्यान काय? हा, तसो शिन्दुदुर्गाचो आन कोल्हपूरचो जवळचोच संबध आसा. मी B.Tech. करुक ४ वर्षा कोकनात होतय मरे, त्यामुळं माका मालवणी भाषा बऱ्यापैकी समजता. पण एक गोष्ट मात्र माका जाम खटकली हा. जशी कोल्हपूरी "रां" कार आणि "भ" काराशिवाय पूर्ण होना नाय तशी मालवणीसुद्धा "माय****" नसले तर झणझणीत लागना नाय. त्यात कमीपणा वाटुचो काय प्रश्नच नाय !!!!

**आधी म्हटल्याप्रमाणे तुझा सर्वसमावेशकपणा प्रत्ययास येत आहे.

keep writing!!!

इतिBlogger abhijit
Thursday, May 25, 2006 6:30:00 PM  

गायत्री, मस्तच! खूप दिवसांनी "ब्लॉगलीस", आणि तेही एकदम मालवणी धमाक्यात!

इतिBlogger Sumedha
Thursday, May 25, 2006 9:30:00 PM  

गायत्री, मस्तच! मजा आली वाचायला!

इतिBlogger Manjiri
Friday, May 26, 2006 10:37:00 AM  

वां! माज्याय जिवाक बरा वाटला मांलवणीच्या इतक्या जाणकारांका/ वाचपकारांका बघून. नंदन (वाडीकडे तुका नंदग्या म्हणत असतलींत मरे?) 'बारा मैलांचा' तुजा म्हणणां खरांच. तसो हो रूल सगळ्यांच बोलीभाशांका चलात.
आजीशी मालवणीत बोलणां म्हंणजे पर्वणीच मरे!
मियां म्हटलंय तसो माझो सराव शून्यच - पण १. आहे = आसा, आणखिन २.असते = आसंय हो माका म्हायत असलेलो अर्थ. बाबांका विचारून खात्री करूक होयी.

अभिजित, (छ्या! सरळ नावांन हाक मारणां मालवणीत शोभना नांय.) तुजा म्हणणा १००% खरां.

सुमेधा, (सुमल्या!) कॉलेजाक सुटी असल्याकारणान इंटरनेटाचो मोठोच प्रॉब्लेम झाल्लो हा. पण त्यांतंय थोडो थोडो वेळ गावलो काय लिहून ठेवतंय.

मंजिरी, (माज्या चुलतबहिणीचा नांवय मंजिरीच आसा. तिका घरात 'मनगणं' म्हंणतत! :)) तुझो ब्लॉग वांचलंय. 'सलाम' ला माझां मुंडी हलौन अनुमोदन!

उपसौंहार:
मालवणीची कंवतिकां सांगणारो मोठो 'आदरणीय' दुवो आताच हाती इलोहा: http://www.maayboli.com/hitguj/messages/103385/49064.html?1050960766

मालवणी म्हणींचो खजिनो तर थंयसर आसाच, आणी मांलवणीत तरबेज असूनंय ती दुसऱ्यांका शिकौक उत्सुक असलेले गजालीकांरय आसत. चला मगे, 'जिवाक वाचा'!

इतिBlogger Gayatri
Friday, May 26, 2006 6:17:00 PM  

u seems to be one heeluva linguistic kaleidoscope !!
just a flick of wrist and there are all all sort of color and shape all over the blog....

marathi,sanskrit,english and now these last two stroke....and the best part is it is getting better n better...

ek prashn (not sure if i should ask but still)
tu 'ektaki' aahes ka ?

mala vatate aahes !!

Saksham

इतिAnonymous Anonymous
Friday, May 26, 2006 8:09:00 PM  

kite go.. (haaMgaachyaan devanaagarI baravapaak miLanaa!)

raaNo joraan aasaa mhaTalyaar saglyech maalavaNi shikUk laagalye jaNu!
:)

इतिBlogger गिरिराज
Saturday, May 27, 2006 3:47:00 PM  

'आसंय' चा अर्थ मी सपशेल चुकीचा लावला होता :) "अंय" कारान्त सारी क्रियापदे प्रथमपुरुषी एकवचनात वापरली जातात हे विसरून.
नंदन, चूक दाखवल्याबद्दल धन्यवाद! (इतर करतात तो छिद्रान्वेषीपणा, आपण धरतो तो परिपूर्णतेचा ध्यास! :D )

सक्षम, 'एकटाकी' असण्यात विशेष काय आहे? मराठीच्या पेपरातला निबंध लिहिताना आपण सगळेच नसतो का एकटाकी? :)'एकटाकी' हे विशेषण विचारांचा ओघ/ सुसूत्रता दर्शविण्यासाठी वापरलं जातं हे खरं..आणि माझ्या डोक्यातली blog ची संकल्पना 'जे वाटलं ते आणि वाटलं तेव्हा खरडून काढावं' अशी काहीशी असल्यामुळे बऱ्याचदा open to finish लिखाण होतं हेही खरं. पण ते तर सगळ्याच bloggers चं होत असणार..that's apparent from the spontanity in the writing, especially whenevr someone's narrating some experience. पण कधीकधी लिखाणात (विशेषत: थोडसं कल्पनारम्य असेल तर) परत वाचल्यानंतर थोडाफार बदल करणं जरुरीचंच होतं..कधी एखादा शब्द अस्थानी वाटतो, कधी 'हीच गोष्ट अजून परिणामकारक रीतीने सांगता येईल' असं वाटतं.मग दुसरा/तिसरा/चौथा टाकसुद्धा वापरावा लागतो :D and yeah, I didn't get the reason behind your pondering over whether to ask the question or not!

गिरग्या, मियां पालथ्या पडान सारंयत होतंय तेवांय मालवणी आयकलंली आसंय रे. हो राणो काल-परवाचो. त्येच्या धरमान मालवणी शिकणां म्हण्जे सोनियाच्या धरमान पिझ्झो खावक लागण्यासारखो आसा!

इतिBlogger Gayatri
Monday, May 29, 2006 7:33:00 PM  

Ektaki aasanyat kiva nasnyat kahi vishesh aahe ase mala vatat nahi, nidan vachnaryan sathi tar ajibat nahi. It doesn't make you a lesser or more writer.

As a reader , as long as I connect to ur words n thoughts, 'How u write it' is hardly matters.

But as a writer , jar maze likhan mi mazi abhvyakti mhanun grahya dharali tar mazya 'Ektaki' likhanat aani 'Itar-taki' lihinyat farak nakich aasava.
Titkach, jitaka pavasachya aani natachya panyat aasato (actually " 'Taki' chya panyat" mhanane jast samarpak tharel )

Aata dahavichya nibandh likhanala me 'Abhivyakti' mhanane mhanje Mangesh Padgaonkar-anchya dadhila aayath mhanya sarkhe aahe (upama mazi nahi , most probably Shirish Kanekar hyana stravali hoti)

Ok, coming back to what being 'Ektaki' means for me as a writer and does it really different from being otherwise. (I am not talking about whether it is right or wrong because to me it's none of any )

How many times do you edit ur personal diary or any other expression which is just for ur self and not for diplay,exhibition or any other sort of sharing ? if no then why not ?

Lihilelya Kavitatil , 'geyata' kiva 'parinam' vadhvayacha mhanun, shabd rachana , yamak badalne mhanje 'Dusari Tak' vaparane ase mala vatat nahi
but have u ever tried to change the meanning or the message without feeling restless about it ?

Pahile likhan, nuktyach janmalelya abhraka sarkhe aasate, tutaleli nath, chikat vas, raktache dag should on any other occession make it ugly enough to avoid and still for any mother/father that is the most beautiful sight they have ever seen.
Hech punha barshyala pathanyat nahu-makhu ghalun, kajal,powder lavun, rangit mukut aani zabale ghatle le golu lok sudha khup sundar distat but I think you will agree ki pahilya aani hya anubhavat farak aahe..mag donhi titkich nitant sundar aasli tarihi.....

Now few more apologies....
- Adhikar nasalelya vishyavar tond (?) ughadlya baddal
- For mix language writing
- For these apologies

- Saksham

इतिAnonymous Anonymous
Wednesday, May 31, 2006 5:57:00 PM  

गो गायत्री, तुका बुक-टॅग करुन कितके दिवस झाले. कधी वेळ गावात तसा लिव. बाकी काय चल्लाहा? आता फुडचो लेख वऱ्हाडी/अहिराणीवर येवांदेत.

इतिBlogger Nandan
Friday, June 02, 2006 10:31:00 AM  

Hello Gayatri,

Aapla Blog Kharach Manapasun avadla !

sasneha
Mugdha

इतिBlogger Raina
Friday, June 02, 2006 1:07:00 PM  

सक्षम, अधिकार नसलेल्या विषयावर इतकं मुद्देसूद लिहिलं आहेस तर अधिकार असलेल्या विषयावर .. :) do you blog on some site other than blogspot? would love to have its link.

धन्यवाद अभिनय, तुम्हां दोघांच्या अभिप्रायांमुळे या विषयावर थोडा विचार केला गेला.

@ नंदन: खान्देशातले भाशेत लेख ल्याहाले ती भाशा आइकायले पाहिजे नं बाप्पा! मले तं तिचा गन्ध न्हाई जी. कुठेशी आयका-वाचाले भेटंन तं मंग लिह्येन की जी.
(हे एवढंच येतं मला विदर्भ/ मराठवाड्याकडल्या भाषेसदृश वाटेल असं. तेसुद्धा 'मृण्मयी' तल्या गाडगेबाबा-भेट प्रसंगावरून. आता तिथे पण १२ मैलांच्या नियमानुसार किती फरक असतील! :) )

कहर म्हणजे तू मला पुस्तकांच्या मंदियाळीत खो दिलायस हे मला ठाऊकच नव्हतं. मे च्या पहिल्या १५-२० दिवसांत परीक्षा वगैरे मुळे ब्लॉग वाचन बंद असल्याचा परिणाम! आता नक्की लिहेन ..विषय वाचूनच काय आणि किती लिहू असं झालंय :D

इतिBlogger Gayatri
Tuesday, June 06, 2006 1:42:00 PM  

maze gav malvan pan " maka nay yet malvani" ani tu ....
great !!!!

इतिBlogger Rupesh Talaskar
Sunday, June 11, 2006 12:40:00 AM  

गायत्री,
तू म्हणजे 'ग्रेट'च आहेस. तुझ्या भाशाप्रभूत्वावर बोलावं तितके कमीच आहे. मालवणी लेख आणी नंतर खान्देशी मध्ये कॊमेन्ट सहीच आहे.
मी आजपासून fan आहे.

इतिBlogger A
Thursday, June 22, 2006 11:28:00 PM  

गे चेडवा.. मिया तुझो कोल्हापुरी ब्लॉग वाचलय तेवा माका वाटला तू अस्सल कोल्हापुरी आसस.. ह्यो ब्लॉग वाचल्यार माका आता वाटता एकतर ह्यो ब्लॉग तरी तुया लिवाक नाय नायतर तो तरी.. :)

Hats off..

दोनवले ब्लॉग एकदम अस्सल वाटतत.. बाकिचे पण मस्तच आसत.. असाच लिवत रव.. वाचूक बरा वाटता.. :)

इतिBlogger amity
Tuesday, July 25, 2006 12:37:00 AM  

I m not a regular reader,especially
blogs-but i enjoyed ur malvani n airani too much.pls do write something related to pune/mumbai marathi...as a mater of fact,i read
ur blog n came to know it cld be that interesting...gajanan

इतिAnonymous Anonymous
Thursday, March 22, 2007 8:40:00 PM  

तुजा पु.ल. वरचा blog वाचला होता, ह्यो मालवणी मधला दुसरा..!! आईच्यान लई बरा वाटला माका...!!!मालवणाक सोडून आता वर्षे उलटली पण मनातली मालवणी काय जाउक तयार नाय. चांगली ४ वर्षे होतय मी मालवणात...!!
टोपीवाला हायस्कूल मधे..! थयसर गेल्ल्यावर अजुन माका माजा कोल्हापुरी विसराक होता..!!
आता १० महिने जाले USA ला येउन, ह्यो blog मिळालो आनि बरा वाटला..(रोज रोज नेट वर मटा, सकाळ वाचुन कंटाळलो होतो)
मालवण सुटलं तरी मनातलं मालवण मात्र अजुन आहे तस्सं आहे,अगदी एखाद्या still life चित्रासारखं,जणू काही माझीचं वाट बघत असल्यासारखं.., अजूनही धक्क्य्यावर कोजागिरी साजरी केल्याची आठवण ताजी आहे,ताज्या सुरमयी सारखी........! चिवल्याची वेळ, विश्रामग्रुहाच्या मागचा खडकाळ किनारा, सिंधुदुर्ग..,आणि आमचं टोपिवाला..... सगळं मनात अगदी घट्टं रुतुन बसला आहे. तुजा मालवणी वाचला आणि ह्या आठवणी बाहेर पडल्या...........
अभिजित पाटील

इतिBlogger Unknown
Saturday, March 08, 2008 3:36:00 PM  

गे बाय माझ्या! मालवणीतसून लिवलस! :)
जिवाक कसा गार वाटला माझ्या वाचूनही! बरा होऊ दे गो बाय तुझा!

इतिBlogger यशोधरा
Saturday, January 10, 2009 12:38:00 PM  

Post a Comment

<< Home