Monday, May 01, 2006

म्हाराश्ट्र दीन

काय राज्याव, कवा आलाइस? उश्शीर आलाइस काय? न्हाइतरी तुला आनि काय काम आसतंय घरात लेका? च्यायला पोरीबी चांगल्या न्हाइत राव तुमच्या गल्लीत. येक ती राजमान्याची होती, तिला बी भैन मानून मोकळा झालाइस. मं हितं यायचं आनि पारवळ बघायची, खरं का नाय?
बर ते जाउंदे. तू हितं उभारून नुस्ता टायमपास कराइलाइस न्हवे? चल की जरा राडा करून येउ म्हने. कुटं का आसंना च्यामायला? बाइकवरनं नेनाराय न्हवे? तंगड्या तोडाय लावनार नाय काय. आज कोन वार हाय काय म्हायती हाय का न्हाई? ह्यॅ! सोम्वार म्हनं! आरं भाड्या, आज काय पेशल डे हाय काय त्ये इच्चारायलोय मी. ऑं? म्हायती न्हाई? काय केल्तं काय शाळंत तुमी साल्यानो? न्हाइतरी तुमची शाळा तसलीच रडकी म्हना. बर बर, राह्यलं. शाळंला काय म्हनलं की काटं टोचत्यात तुमास्नी.
आरं आज म्हाराश्ट्र दीन हाय म्हनं. त्ये संज्या भेटलेलं पापाच्या तिकटीपाशी. संज्या म्हंजे..त्ये ब्याटरी लावतंय त्ये..हां. मला म्हनलं चल, बिंदू चौकात भाशन हाय. त्येला म्हनलं आमाला काय कामं न्हाइत काय दुसरी? उगाच रं. त्ये बेनं कस्लं काव आनतंय म्हाइत हायच कि तुला. राजीव दिक्शित ह्ये, राजीव दिक्शित त्ये, सोदेशी वापरा, गरिबाची गळचेपी..काय काय लांबड लावत बसतंय उगाच.म्हनलं कट मारायचा त्येला आनि आपल्या ग्रूपमधी यून कायतरी ठरवायचं. कायतरी म्हंजे ह्येच की..प्ल्यॅन करायचा रं येवस्थशीर. गनपतीच्या वेळी कस्ली मजा केलेली का नाय? हां मग? ह्ये बग, आधी आसंच ऐशीनं जायचं बारटक्क्यांच्यात. मामा वळिखत्यात पप्पांस्नी. शिवाजी म्हाराजांचा फोटो अस्तोय रं मोठाच्या मोठा त्यांच्यात. तो उचलायचा, मग तराट रॉकीच्यात जायचं. मागल्या खेपेला त्येनं लाउड्स्पीकरचं पाह्यलेलं न्हवे? आता म्हाराश्ट्र दीन हाय म्हनल्यावर आनि फोटो पाह्यल्यावर त्येच्या घरची लोकं काय न्हाई म्हननार न्हाईत. मोबाइल हाय का नाय तुज्याकडं? अमऱ्याला, सरड्याला तेन फोन मार की जरा. वर्गनीचं बघू म्हने. कोन काय आवाज काढाय लागलं तर जै भवानी जै शिवाजी म्हनायचं जोरात. गनपतीत 'लाउड्स्पीकरच्या आवाजाचा त्रास होतोय' म्हनून ट्यॅंव ट्यॅंव करायलेलं ते खरीकर..दोन दिवस मोटरीच्या टायरीतली हवा निगाली तवा मुकाट बसलं का न्हाई? येवढी देशभक्ती दाखवाय पायजे की त्यानी पन.
जै म्हाराश्ट्र! जै दीन!

20 Comments:

:))

इतिAnonymous Anonymous
Monday, May 01, 2006 5:07:00 PM  

Parval
Peshal
Kelta (not kelat!)
Toachtyat
Byatri
Bhashan
Bena
Yevasthsheer
80ni
Tyaav-tyaav
...
...

Aga aai ga! Paak baad zalo mi vachun. Tumcha haat dharne nai, Gayatri. Barkya barkya goshti kashya fass-class tiplyat.

Hats off to you!

This is the best thing you can read on a dull maharashtra day when everybody else is enjoying a holiday, but you are working your ' ' off in office

I didnt miss 'shivya' in "mharashtra din" (though a few here and there would have been invariable), but i am sure you know what is supposed to be there in the gap :)

Too good! Keep writing!

इतिBlogger Ojas
Monday, May 01, 2006 5:47:00 PM  

Too good...mazya maharashtra dinachi suruwaat ashi hoil as waatale nawhat.

इतिBlogger Priyabhashini
Monday, May 01, 2006 6:28:00 PM  

:D ठ्यांक्यू बर काय सगळ्यास्नी.

ओजस,बरोबर आहे. रांकार आणि भकार यांनी सुरू होणाऱ्या काही विशिष्ट शब्दांखेरीज कोल्हापुरी 'शहरी' मराठीला पावर येत नाही. पण लिखित स्वरूपात त्या बिचाऱ्यांना टिंबे आणि फुल्यांच्या बुरख्याआड दडण्याखेरीज गत्यंतरच नाही, त्याला काय करणार!

म्हाराश्ट्र दिनाच्या पवित्र दिवशी लोकाना ऑपिसात कामाला जुपनाऱ्या म्यानेजमेंटच्या बैलाला **** ! कसं मन्ता? :)

इतिBlogger Gayatri
Monday, May 01, 2006 7:17:00 PM  

Chhan. 'Deen' mastach.

इतिBlogger Nandan
Tuesday, May 02, 2006 12:45:00 AM  

लई भारी..

इतिBlogger amity
Tuesday, May 02, 2006 8:40:00 PM  

Jhakas... Lai bhari..
JAGAT BHARI ...

इतिBlogger Bhanamati
Friday, May 05, 2006 12:52:00 AM  

पन मी काय म्हंतो, तुमास्नी येवडं झकास घाटी (माफ़ी असावी ग्रामीन)कसं काय जमतं बुवा..

तसे आमी मूळचे कराडकर..पन जवळ जवळ आक्का भारत फ़िरलू...आनी तरी सुदा आम्च्या भाषेची इतकी एगज्याक्ट नक्कल आयकली न्हवती.

त्यामूळे तूमचं गाव कंचं इचारायचा मोह झाला...आन जर का तुमी सातारा सांगली कोल्हापूर पट्ट्यातलं नसाल तर आयच्यान सांगतो तुमी लय भारी हायसा.

आसंच सगळ्याला सामावून लिहित जा...काय म्हंतात ते तिच्यामारी All Rounder..

इतिBlogger abhijit
Friday, May 05, 2006 9:01:00 PM  

Sunder... "Bhadya" ha shabda agadi sahi vaparala aahe.

-Jaydeep.

इतिAnonymous Anonymous
Sunday, May 07, 2006 10:19:00 AM  

गायत्री तुझे सगळेच ब्लॉग्स अतिशय छान आहेत. प्रत्येक पोस्टवर comment द्यावीशी वाटत होती खरं तर. नियमित लिहित जा, मी नियमित वाचत जाईन ( च)! :-)

इतिBlogger श्रद्धा कोतवाल
Monday, May 15, 2006 11:10:00 AM  

गायत्री...येकदम बेस!!...येकदम झक्कास लिवलंय बगा. तुमचंबी खरं हाय तसं...म्हाराश्ट्र दीनच झाला हाय..काय करावं काय कळंना झालंय जनतेस्नी!!..कोन दिशा दाकवनार त्यान्ना!!

अमित

इतिAnonymous Anonymous
Thursday, May 18, 2006 6:41:00 PM  

तुम्ही छान लिहिता...

इतिBlogger Yogesh Bang
Friday, May 19, 2006 10:02:00 PM  

पुन्यांदा आनि ठ्यांक्यू!

यादौसायब, आमी जनम्लो आनि वाडलो बी कोल्लापुरातच. तवा ही भाशा ज्येवडी तुम्ची हाये त्येवडीच - न्हवे बांगडीभर (किव्वा 'बोलाईच्या' तंगडीभर) जास्तीच आम्ची बी हाये!

शर्दाताई, येक्दम भारी वाटलं बर काय तुम्ची क्वॉमेन्ट वाचून. न्येट यॅक्सेस काय नीट न्हाई खरं आता दोन-तीन म्हयने तरी..तरीपन येळ मिळंल तसं ल्हीत जातो(च) बघा.

आमित, काय राव ह्ये खुळ्यागत कराइलैस? दिशा दाखवाय त्ये कम्पास आस्तंय त्येवडं पुरतंय की.
पन शिरेसली बोलायचं म्हनलं का नाय, तर दीन म्हाराश्ट्राला सुदिन दावाया आपुनच काय तर कराय पायजे. बगुया, पोपटपंचीशिवाय फुडं आनखिन काय जमतंय काय त्ये.

इतिBlogger Gayatri
Sunday, May 21, 2006 3:46:00 PM  

zakkas reply..

Keep writing..

इतिBlogger abhijit
Monday, May 22, 2006 8:29:00 PM  

गायत्री, लय भारी बगा. आमस्नी घरची आटवण झाली.

इतिBlogger Mints!
Friday, May 26, 2006 11:27:00 PM  

raanDechya naaaaadkhuLa lhilayis.

lai time zala tuza blog vachun..aaj gharla basloy mhanun vaachaloy ek ek.

yeL miLala kee kwament karin.

-jugnoo bhai.

इतिAnonymous Anonymous
Tuesday, June 06, 2006 6:02:00 PM  

आरं तिच्या आयला..जरा बीजी व्हतो त्यामुळं लै दिवसांनी ह्यो ब्लॉग वाचला. येकदम नाद खुळा.

इतिBlogger Vishal K
Friday, August 04, 2006 12:53:00 PM  

टोटल नाद खुळा!

इतिAnonymous Anonymous
Saturday, November 18, 2006 4:55:00 PM  

pahilyanda ch aale b;og war lekh zakas !

इतिBlogger Asha Joglekar
Saturday, July 19, 2008 8:53:00 PM  

lai bhaari! :)

इतिBlogger Dk
Tuesday, March 17, 2009 9:29:00 PM  

Post a Comment

<< Home