ग़ज़ल
गेल्या काही महिन्यांपासून या काव्यप्रकाराने मला भलतंच वेड लावलंय. अर्थात गाणं ऐकताना देखील सुरांपेक्षा त्यातल्या शब्दांवर जीव ओवाळून टाकणाऱ्या मला ग़ज़लेची संकल्पना आवडली नसती तरच नवल. या बेहद्द सुंदर काव्यप्रकाराची, मुख्यत: त्याच्या व्याकरणाची ओळख झाली ती "what is a ghazal" या अभय अवचट यांच्या लेखातून. मग नुकतीच मनोगत वर प्रत्यक्ष सुरेश भटांनी लिहिलेली ही लेखमाला वाचली, आणि ग़ज़लेचं सौष्ठव नव्या रूपात नजरेसमोर आलं. या वृत्तात लिहिणं हे येरागबाळ्याचं काम नाही, हे जाणवलं.
पर्शियन भाषेत ग़ज़ला म्हणजे 'हरीण'. डॉ. रघुपतिसहाय फ़िराक़ गोरखपुरी यांच्या लिखाणात ग़ज़लेची एक अतिसुंदर, हळवी व्याख्या आहे म्हणे: "पारधी मागे लागल्यामुळे प्राण वाचविण्यासाठी एक हरीण रानात सैरावैरा दौडतो आहे. पळता पळता दुर्दैवाने त्याची शिंगे झाडांच्या फांद्यांमध्ये अडकतात. अशा अवस्थेत ते बिचारे मोठ्या कष्टाने नजर तिरकी करून मागे पाहते, तो पारधी अगदी जवळ येऊन ठेपलेला असतो. आता साक्षात मृत्यूच डोळ्यांसमोर दिसत असताना त्या असहाय्य हरिणाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागतात. त्या अश्रूंना लाभलेले शब्दरूप किंवा त्या क्षणी त्या ग़ज़ालाच्या मुखातून उमटलेली आर्तवाणी म्हणजेच ग़ज़ल!"
आता इतक्या तरल व्याख्येला जागायचं तर कुणी म्हटलंय तसं
"अपना लहू, तेरी ताऱीकी (तेज), रानाई (कृष्णवर्ण) इस दुनिया की"
असे सारे रंग जवळ घेऊन बसावं लागत असणारच ग़ज़ल लिहिताना.
त्यामुळे ग़ज़लसदृश काहीही खरडताना 'अव्यापारेषु व्यापार' करत असल्याची जाणीव असते, आणि 'ग़ज़लेचे बरेचसे लिखित/ अलिखित नियम पाळणारं' काहीतरी लिहिता आलं तर छान, इतकीच अस्मादिकांची स्वत:कडून माफक अपेक्षा असते!
हां, तर आज डोक्यात असा विचार घोळू लागला, की आशिक़ीवाल्या ग़ज़ला या खूपदा 'तो'च का म्हणतो 'तिला' उद्देशून? आता असं म्हणतात की उत्कृष्ट प्रेमग़ज़लेच्या निकषांपैकी एक म्हणजे ती ग़ज़ल प्रेयसी आणि परमेश्वर या दोघांनाही एकसमयावच्छेदेकरून लागू होते. तशीच ती "प्रियकर किंवा परमेश्वर" अशी दुहेरी का नसावी? आपल्याकडे तर आहेतच मीरेच्या "एरी मैं तो प्रेमदिवानी" सारख्या रचना! मग 'शायर' सारखी 'शायरा' का नसावी? तिनी आपल्या 'साक्या' ला उद्देशून काही का न म्हणावं?
मग केवळ त्या हट्टाखातर एक ग़ज़ल 'पाडायची' ठरवली. (क्षमस्व, क्षमस्व!) पण गंमत अशी, की अख्ख्या ग़ज़लेत एकच लिंगसूचक क्रियापद उगवलं, आणि ग़ज़ल पुन्हा वाचताना अगदी न राहवून मी ते पुल्लिंगी बनवून टाकलं.
असो... पण कधीतरी मी स्त्रीवादी भूमिकेतून ग़ज़ल लिहिणारच आहे !
(आजची ग़ज़ल अशी होती :
हृदयात ध्यास आहे नयनांत आस आहे
नि:श्वास होत जातो प्रत्येक श्वास आहे
पाहून पायवाट, म्हणतो मनास मीही
दोघांस चालण्याला दिसते झकास आहे
ही वाट देखणी अन छायेत नाहलेली
पण ऊन कोण कुठले लागे मनास आहे
वृक्षास जेथ हलके बिलगून वेल दिसते
थबकून पाय तेथे, थोडा उदास आहे
घुमवीत सूर रानी कुणी पाखरू दिवाणे
त्यांचीच चाल आता या मन-रथास आहे!
)

2 Comments:
ही गजलेची व्याख्या मला माहीत नव्हती! पण गजल काय 'चीज' असते हे माहीत होते. () गजलेचा मूळ उद्देश ईश्वराची आळवणी हाच असावा असे वाटते. तिथे प्रेयसी म्हणजे ईश्वर, मयखाना म्हणजे ईश्वराशी प्रणयाची जागा आणि मद्य आणि त्याची नशा म्हणजे ईश्वराशी होणाऱया प्रणयातून मिळणारा आनंद, अशी रुपकेही गजलांमध्य वापरली जातात.
मराठीत गजलेला विराणी म्हणतात, ते तिच्या विरही स्वभावामुळे. या नात्याने ज्ञानेश्वर मराठीतले पहिले 'गजल'कार ठरतात.
तू म्हणतेस ते पटले, शायरा का नसावी? तुझी गजलही छान आहे.
jamal t ek aaikawe...
'Lata mangeshkar Sings Ghalib'
Music : Hridaynath Mangeshkar
Ani arthatch, Mehedi Hassan
shodhun nahi sapadal t kalawa. dein.
Urdu ghazal haa ek weglach prant aahe. tyach marathipan ha ek wegla wishay aahe.
Post a Comment
<< Home