Wednesday, March 01, 2006

प्रतिक्रिया


काही नवीन वाचलं, पाहिलं, ऐकलं की आपल्याही नकळत मनात त्यावर प्रतिक्रिया उमटत असते. ही प्रतिक्रिया कधी सुमेधा म्हणते तशी 'आहा!' असते, कधी 'महाऽऽन' तर कधी 'छ्या! जमं ना', 'उगाच काहीही!' किंवा 'बळंच बरं का.." अशीही.
काही गोष्टी मात्र मनाला अशा स्पर्शून जातात, की प्रतिक्रिया म्हणून आपणही नवीन काहीतरी लिहून जातो. अर्थात या स्पर्शण्याची तीव्रता त्या कलाकृतीच्या गुणवत्तेबरोबरच आपल्या त्या वेळच्या मन:स्थितीवर बहुतांशी अवलंबून असते, हेही खरंच.
अरुंधती रॉय चं 'God of Small Things' वाचत असताना असं अस्वस्थ करून गेलं खरं. तसं पाहिलं तर वसाहत्योत्तर काळातल्या (Postcolonial Era) भारताबद्दल लिहिणाऱ्या लेखकांबद्दल मी जरा पूर्वग्रहदूषित होते आधी.. सलमान रश्दी, झुम्पा लाहिरी, अरुंधती रॉय प्रभृति "वाट्टेल ते लिहितात. विधिनिषेध नाही." हा त्यामानाने मवाळ आरोप. पण 'भारतातील दारिद्य्र, ओंगळपणा, गलिच्छ्पणा यांचे भांडवल करून जगाच्या बाजारात आपली पुस्तकं खपवणारे' अशी उघड उघड टीका होत असताना 'यांची संगत नको रे बाप्पा' असं वाटणं साहजिक होतं.
पण मग मागच्या उन्हाळ्यात हे पुस्तक हातात आलं आणि उत्सुकतेने पूर्वग्रहावर मात केली.पुस्तक आवडलं की नाही हा वेगळा मुद्दा; पण मला अरुंधतीची लेखनशैली खरंच आवडली. विशेषत: चपखल उपमा देण्याचं तिचं कसब. उदाहरणार्थ, मनाविरुद्ध लग्न होत असलेल्या एका मुलीचं वर्णन ती करतेय. लग्नाच्या दिवशी मुलीला छान लाल साडी, अंगभर दागिने वगैरे घालून सजवलंय. पण काय उपयोग त्या साजशृंगाराचा? अरुंधती म्हणते, "It was like polishing firewood. " चितेसाठीचं लाकूड रंधा मारून गुळगुळीत करावं, त्यातला तो प्रकार होता.
:)


एकूणात, पूर्वग्रह बाळगणं फारसं लाभदायक नसतं!

9 Comments:

तुझी नोंद वाचून, पुन्हा एकदा "आहा" वाटलं :-) माझं देखील God of small things बद्दल अगदी हेच मत आहे. तिच्या लेखनशैली मधे एक प्रकारचा नाद आहे ना?

इतिBlogger Sumedha
Wednesday, March 01, 2006 3:18:00 AM  

तुझी कविता (म्हणजे पहिल्या काहि ओळी) वाचून एका फोटोची आठवण झाली. प्रासादीक वर टाकत आहे.

इतिBlogger prasad bokil
Thursday, March 02, 2006 8:37:00 PM  

अगदी खरं, सुमेधा! नाद, तोसुद्धा केरळमधल्या त्या नौकांच्या तालात पाणी कापत जाणाऱ्या वल्ह्यांचा.. कारण तिचं लेखन त्या पुस्तकात ती जिथली गोष्ट सांगते तिथल्या मातीशी फार इमान राखतं..लोकांच्या बोलण्यात उपमा येतात त्या हटकून स्थानिक, स्वत:च्या रोजच्या जीवनाशी निगडित अशाच.
..तुला गो. नी. दांडेकरांचं लेखन आवडतं का गं?

इतिBlogger Gayatri
Thursday, March 02, 2006 8:59:00 PM  

hi, mala mandar chya blog varun tuzi link milali.. var lihileli kavita kharach faar sahi aahe.
tuzya shailivar ingraji chi chhap nahi he pahun khup changle watle.
asach lihit ja, wachayla khup aawdel.
-chaitanya

इतिAnonymous Anonymous
Thursday, March 02, 2006 11:33:00 PM  

प्रसाद, तुझ्या ब्लॉग वर उत्तर दिलंय.

धन्यवाद चैतन्य!खूप छान वाटलं तुझी प्रतिक्रिया वाचून. 'शैलीवर इंग्रजीची छाप नाही'..:) मार्मिक शेरा आहे. तुला वाचनाची जोरदार आवड दिसतेय. तुझं लिखाणही वाचायला आवडेल. blogging करत नसशील तर सुरू कर!

इतिBlogger Gayatri
Friday, March 03, 2006 6:03:00 PM  

Blog ajun neat vachala nahiye. Pan Hastakshar Atishay sunder aahe.

इतिBlogger जयदीप कुलकर्णी
Sunday, March 26, 2006 5:42:00 AM  

धन्यवाद जयदीप!

इतिBlogger Gayatri
Sunday, March 26, 2006 10:16:00 AM  

Itka rasaaL rasagrahaN wachalyawar, Arundhaticha GOST pustak ata wachalch pahije!:-)Thanks fr sharing...!

इतिAnonymous Anonymous
Tuesday, January 30, 2007 9:20:00 PM  

Hi,

GAYATRI,

I read your article, nice i like it, if you have many more as like article, please up load your blogger section, we are also enjoed as like nice article, i want chat with you, while you get free time,call to me my number is 09920474637 ,ok bye
TakeCare !

इतिBlogger Murti Swami
Tuesday, April 03, 2007 9:08:00 AM  

Post a Comment

<< Home