Herringbone Stitch (2)
E-F.
टाळ्या--टाळ्या--टाळ्या.
उत्तर म्हणून पहिल्या तीन ओळी पाठवल्या असत्यास फक्त तरी चाललं असतं. :P
अरे ’दो जिस्म एक जान’ वगैरे भूलथापा ऐकून तशा ’भूमिके’त जाण्याचा प्रयत्न केला होता रे. पण जमंनाच अगदी. तुझं पत्र वाचून ते सगळे विचार किती उसने आहेत ते लक्षात आलं चटकन. थ्यांक्यूच.
आणि माझ्यावर गुंतागुंतीचा (शी! किती गुंतवळ आल्यासारखं वाटतं हा शब्द लिहिताना!) आरोप करणार्या घुबडा, तू स्वत: काही लिहितोस तेव्हा उपमा आणि प्रतिमा हायस्कुलातल्या पोरींसारख्या कलाकला केकाटत असतात इथे-तिथे, ते सोयीस्करपणे विसरलास की. दिवा आणि भिंगं! ’हुडूत’.
(सॉरी सॉरी..हे फक्त खुन्नस म्हणून. ती प्रतिमा बरी आहे चावायला.)
माझ्या ’वेगळे’पणाचा मुद्दा आणलास त्यावरून मला हादग्याचं गाणं आठवलं लहानपणीचं.
’कृष्ण घालितो लोळण, यशोदा आली गं धावून, काय रे मागतोस बाळा तुला देते मी आणून..
आई मला चंद्र दे धरून, त्याचा चेंडू दे करून - अस्लं रे कस्लं मागणं तुझं जगाच्या वेगळं?’
लहानपणी हे गाता गाता मला यशोदेचा भारी राग यायचा.
एक तर बाळाचं मागणं ऐकायच्या आधीच ’मी देतेच आणून’ असं कबूल करायचं.
मग त्याची अचाट मागणी पुरी करायची आपल्यात पात्रता नाही (किंवा आरश्यात चंद्र दाखवायची कल्पकताही नाही), म्हणून त्याच्यावरच डाफरायचं, ’जगावेगळं’ मागतो म्हणून.
आता झालं ते झालं, पण एकदा समजलंय ना की आपलं पोरगं असं कायच्याकायच मागतं, तर परत परत त्याला तोच प्रश्न काय म्हणून विचारावा?
मग उद्या चांदण्यांच्या लाह्या आणि विंचवाची अंगठी मागणारच की तो. आणि मग परत त्याला ’जगाच्या वेगळं’ म्हणून बोल लावायचा.
जरा मोठी झाल्यावर मला यशोदेच्या त्या शेवटच्या प्रश्नातली अभिमानाची, कौतुकाची छटा जाणवली न् मग कृष्णाचाच राग यायला लागला. म्हणजे आम्ही ज्या गोष्टींसाठी लोळण घातली असती (आई मला भूक लागली..मला जत्रेत पिपाणी हवी, मला पेंद्यानं मारलं..) त्या सगळ्या गोष्टी लांडी-लबाडी, चोरी-मारी-गोडीगुलाबीनं साधून घेऊन मोकळा होणार हा पठ्ठ्या..आणि आईपुढे लोळण घालताना मात्र ही असली जगाच्यावेगळी कारणं तय्यार ठेवणार. येणारच की मातोश्रींचा ऊर गर्वानं भरून!
तुझं काय मत?
--
G-H.
हं, आता कशी लायनीवर आलीस. आणि ते प्रतिमा वगैरे तुला कळेलशा भाषेत लिहावं म्हणून. :P
तुला भोंडल्याची गाणी-बिणी पाठ आहेत? मजा आहे. तुला गंमत वाटेल, पण मलाही आठवतात थोडी थोडी. तसं म्हणजे गाणी पाठ होण्याचं वय येता येताच ’मुलींत मुलगा लांबोडा, भाजून खातो कोंबडा’ म्हणत आमची भोंडल्याच्या फेरीतून हकालपट्टी झाली होती. कसला उचकलो होतो मी! अर्थात नंतर वर्ष-दोन वर्षांत पाटावर हत्ती काढून त्याच्याभोवती गोल गोल फिरत कसलीतरी बावळट गाणी म्हणणं हा महाबावळटपणा आहे हे मत मीही मोठ्यानं दोस्तांच्यात फेकू लागलो होतो. पण तरी "वेऽऽड्याची बायको झोपली होती पलंगावर, तिकडून आला वेडा त्याने निर्खूऽऽन पाहिले, मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकले" याला बीट नाही.
जगावेगळ्या कृष्णाच्या गाण्यात मला यशोदेचा राग येतो, पण तू म्हणत्येस त्यापेक्षा वेगळ्या कारणासाठी. कृष्णाने लोळण घालताना काय मागितलं त्याची एकमेव साक्षीदार ही यशोदाबाई. त्याने मागितलीही असेल तुझ्यासारखी पिपाणी- कुणाला ठाऊक? पण ’कस्सा माझा लेक जगाच्या वेगळा’ हे जगाला दाखवायचा सोस असलेल्या यशोदेनं आपल्या पदरच्या चार अचकट मागण्या ’कृष्णाच्या’ म्हणून खपवल्या नसतीलच असं नाही. आणि वरून तो मोठा होताना त्याच्या मनावर ठसवत राहिली असेल त्याचं वेगळेपण. मग बापड्याला कसोशीनं प्रयत्न करावेच लागले असतील ’लई भारी’ होण्यासाठी. बिच्चारा!
तरी नशीब, त्याच्यात देवाच्या पॉवर्स होत्या सगळ्या. ’अवतार’ वगैरे नसता, तर अनेक चाइल्डहूड प्रॉडिजीज् सारखी वाटच लागली असती मोठेपणी त्याची!
पण ’वेगळा’ चे विलग आणि अलग हे दोन अर्थ नव्यानं जाणवले.
’विलग’ हा ’बिलग’ चा भाऊ वाटतो पण अर्थ दोन टोकांचे.
पाडतेस कविता?

Labels: गुंतुनी गुंत्यांत सार्या