Herringbone Stitch (2)
E-F.
टाळ्या--टाळ्या--टाळ्या.
उत्तर म्हणून पहिल्या तीन ओळी पाठवल्या असत्यास फक्त तरी चाललं असतं. :P
अरे ’दो जिस्म एक जान’ वगैरे भूलथापा ऐकून तशा ’भूमिके’त जाण्याचा प्रयत्न केला होता रे. पण जमंनाच अगदी. तुझं पत्र वाचून ते सगळे विचार किती उसने आहेत ते लक्षात आलं चटकन. थ्यांक्यूच.
आणि माझ्यावर गुंतागुंतीचा (शी! किती गुंतवळ आल्यासारखं वाटतं हा शब्द लिहिताना!) आरोप करणार्या घुबडा, तू स्वत: काही लिहितोस तेव्हा उपमा आणि प्रतिमा हायस्कुलातल्या पोरींसारख्या कलाकला केकाटत असतात इथे-तिथे, ते सोयीस्करपणे विसरलास की. दिवा आणि भिंगं! ’हुडूत’.
(सॉरी सॉरी..हे फक्त खुन्नस म्हणून. ती प्रतिमा बरी आहे चावायला.)
माझ्या ’वेगळे’पणाचा मुद्दा आणलास त्यावरून मला हादग्याचं गाणं आठवलं लहानपणीचं.
’कृष्ण घालितो लोळण, यशोदा आली गं धावून, काय रे मागतोस बाळा तुला देते मी आणून..
आई मला चंद्र दे धरून, त्याचा चेंडू दे करून - अस्लं रे कस्लं मागणं तुझं जगाच्या वेगळं?’
लहानपणी हे गाता गाता मला यशोदेचा भारी राग यायचा.
एक तर बाळाचं मागणं ऐकायच्या आधीच ’मी देतेच आणून’ असं कबूल करायचं.
मग त्याची अचाट मागणी पुरी करायची आपल्यात पात्रता नाही (किंवा आरश्यात चंद्र दाखवायची कल्पकताही नाही), म्हणून त्याच्यावरच डाफरायचं, ’जगावेगळं’ मागतो म्हणून.
आता झालं ते झालं, पण एकदा समजलंय ना की आपलं पोरगं असं कायच्याकायच मागतं, तर परत परत त्याला तोच प्रश्न काय म्हणून विचारावा?
मग उद्या चांदण्यांच्या लाह्या आणि विंचवाची अंगठी मागणारच की तो. आणि मग परत त्याला ’जगाच्या वेगळं’ म्हणून बोल लावायचा.
जरा मोठी झाल्यावर मला यशोदेच्या त्या शेवटच्या प्रश्नातली अभिमानाची, कौतुकाची छटा जाणवली न् मग कृष्णाचाच राग यायला लागला. म्हणजे आम्ही ज्या गोष्टींसाठी लोळण घातली असती (आई मला भूक लागली..मला जत्रेत पिपाणी हवी, मला पेंद्यानं मारलं..) त्या सगळ्या गोष्टी लांडी-लबाडी, चोरी-मारी-गोडीगुलाबीनं साधून घेऊन मोकळा होणार हा पठ्ठ्या..आणि आईपुढे लोळण घालताना मात्र ही असली जगाच्यावेगळी कारणं तय्यार ठेवणार. येणारच की मातोश्रींचा ऊर गर्वानं भरून!
तुझं काय मत?
--
G-H.
हं, आता कशी लायनीवर आलीस. आणि ते प्रतिमा वगैरे तुला कळेलशा भाषेत लिहावं म्हणून. :P
तुला भोंडल्याची गाणी-बिणी पाठ आहेत? मजा आहे. तुला गंमत वाटेल, पण मलाही आठवतात थोडी थोडी. तसं म्हणजे गाणी पाठ होण्याचं वय येता येताच ’मुलींत मुलगा लांबोडा, भाजून खातो कोंबडा’ म्हणत आमची भोंडल्याच्या फेरीतून हकालपट्टी झाली होती. कसला उचकलो होतो मी! अर्थात नंतर वर्ष-दोन वर्षांत पाटावर हत्ती काढून त्याच्याभोवती गोल गोल फिरत कसलीतरी बावळट गाणी म्हणणं हा महाबावळटपणा आहे हे मत मीही मोठ्यानं दोस्तांच्यात फेकू लागलो होतो. पण तरी "वेऽऽड्याची बायको झोपली होती पलंगावर, तिकडून आला वेडा त्याने निर्खूऽऽन पाहिले, मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकले" याला बीट नाही.
जगावेगळ्या कृष्णाच्या गाण्यात मला यशोदेचा राग येतो, पण तू म्हणत्येस त्यापेक्षा वेगळ्या कारणासाठी. कृष्णाने लोळण घालताना काय मागितलं त्याची एकमेव साक्षीदार ही यशोदाबाई. त्याने मागितलीही असेल तुझ्यासारखी पिपाणी- कुणाला ठाऊक? पण ’कस्सा माझा लेक जगाच्या वेगळा’ हे जगाला दाखवायचा सोस असलेल्या यशोदेनं आपल्या पदरच्या चार अचकट मागण्या ’कृष्णाच्या’ म्हणून खपवल्या नसतीलच असं नाही. आणि वरून तो मोठा होताना त्याच्या मनावर ठसवत राहिली असेल त्याचं वेगळेपण. मग बापड्याला कसोशीनं प्रयत्न करावेच लागले असतील ’लई भारी’ होण्यासाठी. बिच्चारा!
तरी नशीब, त्याच्यात देवाच्या पॉवर्स होत्या सगळ्या. ’अवतार’ वगैरे नसता, तर अनेक चाइल्डहूड प्रॉडिजीज् सारखी वाटच लागली असती मोठेपणी त्याची!
पण ’वेगळा’ चे विलग आणि अलग हे दोन अर्थ नव्यानं जाणवले.
’विलग’ हा ’बिलग’ चा भाऊ वाटतो पण अर्थ दोन टोकांचे.
पाडतेस कविता?

Labels: गुंतुनी गुंत्यांत सार्या
14 Comments:
Mala ya sagglyat, saggglyat jasta kay awadla sangu? Te naw. Herringbone Stitch. Kasa suchta g tula asla kahi kahi? Kiti chan kalpana ahe. Tuzya ya kalpaktela salam. =)
Baki sagla kay awadlach awadla. :)
Lihit ja!!
गायत्री, तुझ्या blogच्या नावाचा अर्थ कळायलाच जिथे google वर सर्च मारायला लागतो, तिथे प्रतिक्रिया काय देणार बापडा? पण वाचताना कसं वाटलं सांगू? एक अंधारा रंगमंच आहे. फक्त २ spotlights. तेसुद्धा आळीपाळीने, एकदा त्याच्यावर आणि एकदा तिच्यावर. आणि जणू काही दोघांमधे telepathic संवाद सुरू आहे असं वाटलं.!! weird!!
कुठून शोधून शोधून टाकतेस तू उदाहरणं आणि वाक्प्रचार... लै भारी...
भाग १ मधलं "वस्त्रगाळ मूर्खपणा" हा वाक्प्रचार आवडला.
"गुंतागुंत" हा शब्द ऐकल्यावर माझ्याही डोळ्यासमोर गुंतावळच येते. ;(
आणि
>>पण ’कस्सा माझा लेक जगाच्या वेगळा’ हे जगाला दाखवायचा सोस असलेल्या यशोदेनं आपल्या पदरच्या चार अचकट मागण्या ’कृष्णाच्या’ म्हणून खपवल्या नसतीलच असं नाही. आणि वरून तो मोठा होताना त्याच्या मनावर ठसवत राहिली असेल त्याचं वेगळेपण. मग बापड्याला कसोशीनं प्रयत्न करावेच लागले असतील ’लई भारी’ होण्यासाठी. बिच्चारा!<<
:D एक नंबर
यावर प्रतिक्रिया द्यावी तेवढी थोडी आहे. आणखी पाच-सहावेळा वाचल्यावर पूर्ण पोस्ट (बहुदा) समजेल किंवा समजलंय असं वाटेल त्यानंतर प्रतिक्रिया द्यावीशी वाटेल ती वेगळीच. छ्या.. काय लिहावं इथे तेच सुचत नाही.
त्यामुळे तू असंच सुंदर सुंदर लिहीत रहा. आम्ही (मी आणि माझ्यासारखी अवस्था झालेले जगातले निदान एक-दोन लोकंतरी) वाट पाहतोय तुझ्या उत्तमोत्तम कलाकृतींची.
शुभेच्छा.
भय वाटते कॉमेंट खर्डायला. सायलीच्या फुलांचा सडा पडलाय, त्यावर धोत्र्याचं फूल फेकल्यागत वाटेल! हे नेहमीचंच आहे! :-(
जुग जुग जीती -हय तू! हंय क्या!!
रम्जान मुबारक! :-)
दुर्बोधतेची बेसरबिन्दी :)
Anyway, after reading some of the reactions, just remembered this 'Grace Phrase'!
Chhan lihile aahes, शुभेच्छा.
हे बघ, म्हणजे फार वेगाने मी हरवत जात चाललेय तुझ्या शब्दात.
या घडीला फक्त एवढंच म्हणेन,
आधी का भेटली नाहीस....?
पण 'Herringbone Stitch' प्रकरण मला कळलं नाही म्हणजे संदर्भाबाबतीत पामर अजाण आहे.
सई, ^:)^
’रंगुनी..’ नंतर ’गुंतुनी..’ही ओळ , त्यावरून विचारांचा गुंता, त्यावरून सरळ सूत, त्यावरून धागा, त्यावरून टीप आणि मग हेरिंगबोन स्टिच ;)
चाफ्या, बाप! दोन पत्रं लिहून झाल्यावर हे ’तुम्हारी अमृता’च्या थाटात वाचून पाहिलं होतं मी. बेन्द्र्याला याचं roman transcript देऊन त्याच्यासोबत हे आपल्या मैफिलीत सादर करायची इच्छा होतेय आत्ता!
प्रशांत, खूप खूप धन्यवाद!
चच्चाजान, अय्सा कुच तो बोल्करके म्येरेकु लजाने का णंय हंय क्या! आपक्यी प्येन्डिन्ग म्येल कर्ति मय जल्दीइंच..रमज्याण म्यें सलामत रह्यणा.. दर्ग्ये का फोटु खींचक्ये भेजणा..
पराग, ’बेसरबिन्दी’..किती सुरेख शब्दंय!
सखी, image search मार herringbone stitch वर - भरतकामातली एक टीप आहे ती, तिरप्या zig-zag टाक्यांनी बनलेली. या पत्रांमागची कल्पना त्या टिपेसारखी आहे. ती एका कल्पनेचा टाका घालते, तो तिचा धागा पकडून, त्यावरून थोऽडासा overlap होणारा टाका घालतो पण त्या कल्पनेचा विस्तार मूळ दिशेहून वेगळ्याच दिशेला नेतो. Iterate.
आता मला पाहायचंय की मूळ धाग्याचा रंग आणि पोत एकसंध ठेवून अशी टीप किती टाक्यांपर्यंत वाढवत नेता येते?
च्या मारी, म्हणजे काय कल्पना आहे गं!
Love you for this!!! :)
प्रशांतशी सहमत. वाचतो आहे, पुढच्या टाक्यांची वाट पाहतो.
लय भारी ग.....
तसही मला वाटत होतेच की बरेच दिवसात पोस्ट आलेला नाहीये म्हणजे काय तर एकदम झ्याक शिजत असणार आहे तुझ्या डोक्यात ते ... :)
आपली ओळख नाही ... पण पूर्वी रात्रीचं जेवण झाल्यावर गावाबाहेर एखाद्या शांत ठिकाणी फिरायला जाताना अचानक रातराणीच्या फुलांचा वास आल्यावर, तो वास जमेल तितका भरून घेऊन आहाहाहा!!!! म्हणाल्या शिवाय रहावायचा नाही तसं ह्या ब्लॉग ची प्रतिक्रिया दिल्या शिवाय रहावलं नाही म्हणून हि प्रतिक्रिया.
----एक इंटरनेटसरू
अहो, लिहा की आता...
mi pahilyandach hya blog var alo aaj.. ha lekh khppach awadla.. fakkad jamlaay... lai byesht.. "’विलग’ हा ’बिलग’ चा भाऊ वाटतो पण अर्थ दोन टोकांचे"--- he pan bhari watla!!
असा अभिप्राय नसावा पण तरीही......चाबूक
Post a Comment
<< Home