ओंजळधारेतल्या उष्ण पार्याचा
चहूंकडून छर्यांगत मारा...
तग धरणं खरंच कठीणंय
आणि तगमगणं बरंच सोपं!
**
कर्दळीच्या गाभ्यातला कापूर
असा न् तसा...
शेवटी उडूनच जायचा!
पण पेटत्या कापराची काजळी
कधी पाहिली असतीन् तिनं
तर तिची प्रसवधन्यता
तशीच अबाधित राहिली असती?
**
आज सूर्याला फितूर आहेत सारे
पण दीर्घिकेच्या केंद्राशी पोचू पाहणारं
माझं इमान
कधीतरी तिच्या पलीकडे जाईल
अंतिम सत्यातली मिथ्यता
आणि मिथकांतलं ऋत
भरल्या डोळ्यांनी
डोळे भरूऽऽन पाहील!
चहूंकडून छर्यांगत मारा...
तग धरणं खरंच कठीणंय
आणि तगमगणं बरंच सोपं!
**
कर्दळीच्या गाभ्यातला कापूर
असा न् तसा...
शेवटी उडूनच जायचा!
पण पेटत्या कापराची काजळी
कधी पाहिली असतीन् तिनं
तर तिची प्रसवधन्यता
तशीच अबाधित राहिली असती?
**
आज सूर्याला फितूर आहेत सारे
पण दीर्घिकेच्या केंद्राशी पोचू पाहणारं
माझं इमान
कधीतरी तिच्या पलीकडे जाईल
अंतिम सत्यातली मिथ्यता
आणि मिथकांतलं ऋत
भरल्या डोळ्यांनी
डोळे भरूऽऽन पाहील!
2 Comments:
सुंदर.
अप्रतिम! तिसरी कविता विशेष आवडली.
Post a Comment
<< Home