मूक या सखीस तुझ्या बोलवून जा
स्फुल्लिंग मशालीत एक पालवून जा
शब्द तुझे ताल तुझा सूरही तुझे
गाण्याला मान तरी डोलवून जा
जळणारे गाव तशी पेटती मने
शवागार स्वप्नांचे हालवून जा
पोरटीं भुकेजली - दूध मागती
पाण्यातुन पीठ आज कालवून जा
ही शेवटली हाक, सख्या एकदाच ये
आशेचा दीप तूच मालवून जा
स्फुल्लिंग मशालीत एक पालवून जा
शब्द तुझे ताल तुझा सूरही तुझे
गाण्याला मान तरी डोलवून जा
जळणारे गाव तशी पेटती मने
शवागार स्वप्नांचे हालवून जा
पोरटीं भुकेजली - दूध मागती
पाण्यातुन पीठ आज कालवून जा
ही शेवटली हाक, सख्या एकदाच ये
आशेचा दीप तूच मालवून जा
13 Comments:
ही शेवटली हाक, सख्या एकदाच ये
आशेचा दीप तूच मालवून जा
ranjish hi sahi ka...??
atishay chhan
धन्यवाद योगेश, अतुल.
योगेश, तुझ्या प्रतिक्रियेनंतर "रंजिश.." पूर्ण वाचून काढली. तिच्यातला
'अब तक दिल-ए-खुशफ़हम को तुझ से हैं उम्मीदें
ये आखरी शम्माएँ भी बुझाने के लिये आ' हा शेर वाचला - खरोखर तू उल्लेखलेल्या ओळी त्याचं शब्दश: भाषांतर वाटतायत. लिहिताना तरी 'रंजिश ही सही..' जाणीवपूर्वक डोक्यात नव्हती. नेणिवेत असणार कुठे तरी :) पण इथे कवितेच्या मूळ उद्देशात बर्यापैकी फरक असल्यामुळे 'ही शेवटली हाक..' लिहिताना मला थोडासा वेगळा अर्थ अभिप्रेत होता. आसपासची अशांतता, पराकोटीचं दैन्य, दु:ख, निराशा पाहून अस्वस्थ झालेली एक व्यक्ती - पण स्वत:च्या पांढरपेश्या जगातून अजून बाहेर पडलेली नाहीये. स्वत:तला आत्मविश्वास जागवला पाहिजे , मैदानात जाऊन लढलं पाहिजे हे तिला कळतंय, पण कुठलीतरी बाह्य शक्ती येऊन ते स्फुल्लिंग चेतवेल अशी तिची भाबडी समजूत. Activation energy म्हणून तिला तो सुरुवातीचा 'धक्का' हवाय. आणि त्यानं 'आशेचा दीप मालवावा' म्हणजे काय, तर "कुणीतरी येईल, आपला उद्धार करेल" ही जी निष्क्रिय बनवणारी भावना असते ना, तिचा नायनाट करावा.
खरं तर कोणतीच कविता मला अजिबात कळत नाही :)
पण तू दिलेला अर्थ वाचल्यावर कविता समजली (असं आपलं म्हणायचं!)
फ़ार हलवून टाकणार्या ओळी आहेत.
pahale padha
kuch vata nahi
fir comments padhe aapke
fir vacha
ab accha vata
umar ke sath meri padh ke samazne ki kubbat jati rahi hai..:(
सातूच्या पीठाची गोष्ट आठवली. स्फुल्लिंग मशालीत एक 'चेतवून' जा. असं असतं तर? कारण आशा पालवते. स्फुल्लिंग पेटते/चेतवते. चू.भू.दे.घे.
शब्द तुझे ताल तुझा सूरही तुझे
गाण्याला मान तरी डोलवून जा
या ओळींमधली लय सुंदर आहे.
छान. कल्पना आवडल्या. 'स्फुल्लिंग'बाबत अभिजीतशी सहमत.'स्फुल्लिंग देहात पुन्हा चेतवून जा' असं केलं तर?
:) अभिजित, चेतवून/ पालवून ची शंका अगदी स्वाभाविक आहे. पण त्या दोन ओळी मला तशाच सुचल्या, (’लवून’ च्या यमकासाठी असतील!) मग मी पण ’पालवण्या’ वर थोडा विचार केला. ठिणगी खरं तर पेटायला/ चेतवली जायला हवी. पण इथे या सखीमध्ये चेतना आहे आधीपासूनच - तिच्या मनात अस्वस्थ करणार्या त्या सगळ्या गोष्टींबद्दलचे विचार आहेत, त्यांना प्रत्यक्ष दिसणारे धुमारे मात्र फुटायचे आहेत. शिवाय मला असं वाटलं की ती मशाल जाळपोळ करणारी नाही - परिसर उजळवणारी आहे. तिचं जळणं सौम्य हवं - धगधगता अंगार नको, अंकुरलेली ज्वाळा हवी. "पालवणं" हे क्रियापद ’पालवी फुटण्या’वरून आलेलं असणार असं वाटल्यामुळे ते तसंच ठेवलं मग!
धन्यवाद हेमंतकाका, सक्षम, मिलिंद!
ओघवती आणि सुंदर कविता!
yaa prantatahi ghusakhorii aahech kaa tujhii... uttam! :)
dusara aani shevatala sher prachand avadala. chhaan
Post a Comment
<< Home