उन्हं उतरती होती
जरा वेडूलीच वेळ
तशा सांजप्रकाशात
तुझ्या आठवांचा खेळ
एक हलकीशी सर
होती पडूनिया गेली
तुझ्या लाडक्या जुईत
थरथर भरलेली
वेल साजरी गोजिरी
तिचा लडिवाळ हात
फिरावासा वाटे मला
हळू माझिया केसांत
न्हालेल्याशा प्रकाशात
शुभ्र सात्त्विकशी फुले
तुझे दुधागत हासू
आणि चमकते डोळे
टपकुनि एक थेंब
आला माझ्या गालावर
कोण जाणे कुठे होता
डोळ्यांत की वेलीवर?
जरा वेडूलीच वेळ
तशा सांजप्रकाशात
तुझ्या आठवांचा खेळ
एक हलकीशी सर
होती पडूनिया गेली
तुझ्या लाडक्या जुईत
थरथर भरलेली
वेल साजरी गोजिरी
तिचा लडिवाळ हात
फिरावासा वाटे मला
हळू माझिया केसांत
न्हालेल्याशा प्रकाशात
शुभ्र सात्त्विकशी फुले
तुझे दुधागत हासू
आणि चमकते डोळे
टपकुनि एक थेंब
आला माझ्या गालावर
कोण जाणे कुठे होता
डोळ्यांत की वेलीवर?
12 Comments:
टपकुनि एक थेंब
आला माझ्या गालावर
कोण जाणे कुठे होता
डोळ्यांत की वेलीवर
वा!!
Good...
Dhananjay
surekh.
उत्तम! आता भेटलो की ह्याला चाल लावायचा प्रयत्न करूया! काय? (:D)
'वेडूलीच' वेळ... :) सुरेख शब्द!
aahaa !
tujhya saglyaa posts na hech mhanawasa watata :D
kiti goaD lihilayas :)
टपकुनि एक थेंब
आला माझ्या गालावर
कोण जाणे कुठे होता
डोळ्यांत की वेलीवर?
सुन्द्र!
आह किती गोड आणि हळुवार आलेत सगळे शब्द ..
farach surekh! ekahi awajaD shabd na vaparata, ani yamak juLavaNya saThi kasarati na karatahi, yamak chhaan juLavun punha kavitecha ekasand artha hi sadhalaas. :-)
great!!!
tumhi bhaltyach awaghad ahat tai...
zakkas! lage raho.
इतक्या सुंदर कविता करतेस मग त्यांना नावे(शीर्षक) का गं देत नाहिस?
तुझे सगळेच लेखन अतिशय आवडले.
शुभांगी
Post a Comment
<< Home