Tuesday, February 19, 2008

फार मऊशार आहे हा हिमवर्षाव.

वार्‍यासरशी भिरीभिरी फुगड्या घालत येणारे हिमकण अल्लाद गालांवर उतरतायत.

"तुला बट्टलफ्लाय किश्‌ कलू?" असं म्हणत आपल्या पापण्यांची पिटपिट उघडमीट
माझ्या गालावरती करणारं ते चिमणं पिल्लूच आठवलं मला चट्‌कन!

आणिक एकदा ते रंगीत-रंगीत फुलपाखरू नाकावर बसलं होतं तेव्हा कशा इवल्या गुदगुल्या झाल्या होत्या - तशाच आत्ता पण, कण कण!

मी जीभ बाहेर काढली हळूच. कापूसहलके कण जिभेवर पडून क्षणात वितळून गेले. वर्गात खूप्पच म्हणजे खूप्पच कंटाळा आलेला असला की बाईंचे शब्द असेच डोक्यात टप्पल टाकून उडून जातात.

होता होता चष्म्यावर बर्फानं बस्तान बसवलं. ते झटकायला चष्मा हातात घेतला आणि सहज जाकिटाकडे लक्ष गेलं.. अख्ख्या जाकीटभर बिलगूनच बसले होते बेटे पांढुरके कण! मी म्हणजे स्नोमॅन दिसत असणार..बर्फाचा लडदोबा! मला पिनोकियोच्या नाकाइतकं लांबलचक गाजरनाक उगवलेलं दिसायला लागलं आणि खदखदून हसू आलं. समोरून येणारा मुलगा माझ्या तशा हसण्याकडे बघून मोठ्ठ्या माणसासारखं समंजस खोडकर हसला.


आता पायाखाली बर्फाचा गालिचा पसरतोय. त्याच्यावर पाय ठेवताना बुटाआडून पण रवाळपण जाणवतं बर्फाचं. अगदी पायाशी कान नेला तर कुचूकुचू आवाज येत असणार. चवडे जपून टेकवायचे खाली, नाहीतर सटकायचा पाय सर्रकिनी! खरं म्हणजे आत्ता स्केटिंग करून बघायला पाहिजे इथे. घरी नाही का, फरशीवर पावडर सांडून त्यात घसराघसरी करायचो...

शाळेत पोचेतो पुढची पंधरा पावलं माझी घसरगुंडी मस्त सरकली मग!

"हू हू हू हू..केवढी थंडी आहे.." कुणीतरी म्हणालं.

काहीतरीच काय...केवढी ऊब होती त्या बर्फात!

17 Comments:

>> घरी नाही का, फरशीवर पावडर सांडून त्यात घसराघसरी करायचो...

kasa aathavla tulaa hey? mi chakk visarlo hoto haa khel! :)

apratim lihila aahes.
kharach snow-boarding, skiiing nahitar ice skating karun ye! khup majjaa yete!

इतिBlogger Monsieur K
Tuesday, February 19, 2008 11:41:00 AM  

mastch!!

mii suddha pharashiwar powder chya vakyavar khushch zale!

kiti chhan varnan kelay! awadla...

इतिBlogger Jaswandi
Tuesday, February 19, 2008 12:06:00 PM  

’बर्फातली ऊब’ मस्त :).

इतिBlogger Nandan
Tuesday, February 19, 2008 12:39:00 PM  

too good as usual...

इतिBlogger Meghana Bhuskute
Tuesday, February 19, 2008 12:52:00 PM  

जबरी

इतिBlogger Yogesh
Tuesday, February 19, 2008 5:24:00 PM  

पहिली बर्फ़फ़ुलं.. अंगावर झेलताना खरंच वेड लागतं! सुंदर हळूवार लिहिलं आहेस.

इतिBlogger Tulip
Tuesday, February 19, 2008 7:24:00 PM  

छान लिहीलं आहेस. :)

इतिBlogger सर्किट
Tuesday, February 19, 2008 9:47:00 PM  

लहानपणी (2-3 years old) काशमीरला गेलो होतो तेव्हा आजी म्हणाली "माझ्यासाठी बर्फ घेऊन ये हां ". मी सगळ्यांची नजर चुकवून थोडा बर्फ माझ्या जॅकेटच्या खीश्यात भरला पण होता. घरी येऊन आजीला द्यायला गेलो तर खीसे रीकामी ! चांगलच हसं झालं मग आमचं. अजूनही ते जॅकेट, "केदारने ज्यातून बर्फ आणला होता ते" म्हणूनच ओळखलं जातं.
पुढे चार-धाम ला गेलो तेव्हा तो नेहमी समोरच्या डोंगरावरून चीडवत असायचा... आमचे डोंगर कोरडे.. न्यूर्योकला गेलो तर, "याच वर्षी christmas ला बर्फ नाही "... मला बर्फ फार आवडतो.. पण तो नेहमी असा पोपट करतो माझा...
तुझा अनुभव वाचून एकदम छान वाटलं... आमची सुद्धा होईलच कधीतरी गट्टी... तू सांगून बघ की त्याला जरा... मग आपण snowman करून त्याला चेरीचे डोळे आणि गाजराचं नाक लाऊ !

इतिBlogger केदार जठार
Wednesday, February 20, 2008 4:16:00 AM  

kya baat hai...maja aala....i was wondering why my most favourite blogger was silent?....

इतिBlogger कोहम
Wednesday, February 20, 2008 6:58:00 AM  

Kharach...barfa padtana te bhaghne ani tyatun chalat chalat jane...khup sahee vatata. Out of the world experience ahe toh ek...

इतिBlogger Anand Sarolkar
Wednesday, February 20, 2008 5:17:00 PM  

परवा तू सांगितलंस म्हणून मी पण बर्फ पडत असताना हळूच जीभ बाहेर काढून थोडा 'चाखून' पाहिला होता मऊशार बर्फ़! 'काय सोंग आहे' म्हणून आजूबाजूचे सगळे हसत होते (मोठ्या माणसांसारखे) त्याची तमा न बाळगता :)

खूप गोड लिहीलंयस! ... and I owe you my first 'snow experience'!

इतिBlogger Priya
Thursday, February 21, 2008 11:02:00 PM  

maja aali waachtana, short and too sweet..lahaan mulani lihaava tasa.. nahitari tu kahi kahi photot 6 warshanchi mulgich distes.. [:D]

इतिBlogger Prasad Chaphekar
Friday, February 22, 2008 5:07:00 PM  

ए मला पण बर्फ हवा!

इतिBlogger Shashank Kanade
Monday, February 25, 2008 11:52:00 PM  

sahasa tu lihitis te kalat nahi ani mhanun awadat pan nahi... pan ha jo kahi prakaar lihilayes to bhannatach... 2-3 lokana gola karun tyana wachun suddha dakhawla :)
zakaaaasss!!

इतिAnonymous Anonymous
Tuesday, February 26, 2008 3:01:00 PM  

pharch chan sorry thode late vachale

इतिBlogger ulhas Gadre
Monday, March 17, 2008 9:14:00 PM  

फारच सुंदर!

इतिAnonymous Anonymous
Sunday, March 30, 2008 5:58:00 PM  

आणी मला वाटले होते तुम्ही बॉग लिहीणे बंद केले आहात.

इतिBlogger HAREKRISHNAJI
Friday, April 04, 2008 10:28:00 PM  

Post a Comment

<< Home