Sunday, March 30, 2008

थंड ढगांची करडी राख आभाळबाबा अंगी फासून
बं बं बडबड करीत बसले एकलकोंडे दुपारपासून
अवतीभवती जमिनीवरती थिजले झुडपांचे सांगाडे
त्यात पलिकडे घुटमळणारे कुलुंगकुत्रे शेपुटवेडे
माती काळी: जणूं काजळी विझल्या चिलमीच्या तोंडावर
तिच्यात रुतलेली गवताची पाती पिवळटलेली जर्जर
पडेल वारा मध्येच उठतो, तिडिकीने येतो अंगावर
सोबत धुळकट भपकारा अन्‌ कानांमध्ये भयाण चरचर
कुणास ठाउक कुठे दडाल्या तुडतुडणार्‍या धीट खारुल्या
केविलवाणे चिमणपाखरू हाका देते भेदरलेल्या
असल्या दिवशी असे वाटते गुडुपगोधडी झोपुनि जावे
आजीने थरथर-हातांनी थोपटल्याचे स्वप्न पहावे!


***

छ्या! काय पण दिवस आहे. सूर्यदर्शन नाही सकाळपासून. ते सोडच - शिशिर गेला म्हणजे बर्फसुद्धा नाही. बर्फाच्या पांढर्‌या मायेची दुलई असली म्हणजे बोचर्‌या वार्‌याबिर्‌याचा टेंभा काही चालत नाही आपल्यापुढे. आता आठवडा झाला की, 'वसंत येणार, येणार' म्हणता म्हणता. एक तुरा दिसायचं नाव नाही झुडपांवर. ते एक पाचफुटी बावळट झाड तर नोव्हेंबरापासून पानांची वाळली लक्तरं अंगावर घेऊन बसलंय. अरे गेल्या दिवसांची एवढी माया कशाला बाबा? जाऊ दे वार्‌यावर उडून त्यांना. नवीन कोंभांना जागा नको द्यायला तुला?
ते काही नाही. असल्या दिवसाला तसल्याच हुडहुड्या कवितेनं उत्तर द्यायला पाहिजे. केव्हापासून बोरकरांची 'चित्रवीणा' आणि अनिलांची 'आभाळ निळे नि ढग पांढरे' डोक्यात रुंजी घालतायत. त्यांचा 'प्रभाव' पडल्याशिवाय कसा राहील?
ओ रे बोशोन्तो, एइ दिके आय! जरा इकडे ये ना बाबा..वाट पाहत्येय केव्हाची मी.. घर तुलनेने साफसूफ आहे पूर्वीपेक्षा, आणि जांभळ्या तुरेवाल्या फुलझाडांच्या बियांचं पाकीटपण तय्यार आहे!

18 Comments:

वा! ’आभाळबाबा’ वरुन कुसुमाग्रजांची ’माथ्यावरचा आभाळबाबा सवाल आता पुसत नाही, पृथ्वी झाली पावलापुरती अल्याड पल्याड दिसत नाही’ आठवली. शेपूटवेडे, गुडुपगोधडी सहीच. एकंदर दशपदीचा फीलही सुरेख ला आहे.

इतिBlogger Nandan
Monday, March 31, 2008 12:20:00 AM  

झुडपांचे सांगाडे >>> आमची एक मैत्रीण याला झाडाचा एक्स-रे म्हणत असे! :)

कविता सुरेख! लेखही. अगं वसंत कसा, परवा मागमूसही नव्हता आणि आज अचानक कुठून बहरला? - असाच येतो... असाच यावा :)

असो. या साऱ्या काव्यमयतेचा भंग करायला जीवावर येतंय, पण आमाच्याकडे वसंत फुलून ’स्प्रिंग ऍलर्जीज’ चा त्रास पण चालू झालाय :-( आणि मलाही कुसुमाग्रजांचा ’माथ्यावरचा आभाळबाबा’ आठवला एकदम पहिली ओळ वाचून! :-)

इतिBlogger Priya
Monday, March 31, 2008 3:32:00 AM  

nehamipramanech....apratim!!

इतिBlogger कोहम
Monday, March 31, 2008 7:17:00 AM  

खूप सुंदर कविता.

इतिBlogger Yogesh
Monday, March 31, 2008 9:38:00 AM  

मस्तच.

इतिAnonymous Anonymous
Monday, March 31, 2008 11:51:00 AM  

ए मुली किती गोड कविता लिहीलीस गं....
तुझं लिखाण खरोखर फार फार आवडतं... लिहीत रहा...सुचेल तेव्हा सुचेल ते...आणि अगदी असच मनापासून.

मीनू

इतिAnonymous Anonymous
Monday, March 31, 2008 1:41:00 PM  

Very very expressive! vachun lakshat yeta ki kharach konitari khup vaat pahta ahe.

इतिBlogger Anand Sarolkar
Monday, March 31, 2008 2:42:00 PM  

खूप छान

इतिBlogger मोरपीस
Monday, March 31, 2008 8:12:00 PM  

वा! इतकी सुंदर रचना वाचण्यासाठी मधला इतका मोठा विश्राम मान्य आहे :)

मला वसंतावरच्या या चार ओळी आठवल्या:

वसंत वाटे किती गोड साचा
श्रुंगार केला विविध फुलांचा
गळयात कानात करी कटीला
हातात दुर्डीत उणे न त्याला...

इतिBlogger Sumedha
Tuesday, April 01, 2008 10:18:00 AM  

गायत्री,
खूप छान वाटले तुझी ऊत्फ़ूर्त कविता वाचून. परीक्षा छान गेलेली दिसतेय. तुला e-mail करणार आहे. आत्ता फ़क्त एवढच सांगतो की कवि "अनिल" ह्यांच्या चिरंजिवांशी माझी recently ३ तास गप्पांची मैफ़िल घडली. e-mail वरून कळविन मजा आणि कवि "अनिल" ह्यांचे किस्से. बहारदार कवि होते.

इतिBlogger hemant_surat
Tuesday, April 01, 2008 7:32:00 PM  

badibiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii

ek lambe arse baad aapke kisi bacche ne baithke muzse baat ki hai......iske pahale wale kaaiyo ne muze bhaav nahi diya.....so accha laga....bahot.

इतिAnonymous Anonymous
Sunday, April 06, 2008 10:56:00 AM  

kavite peksha lekh jasta ramya aahe. thoda sa roomani ho jaaye?

इतिAnonymous Anonymous
Sunday, April 06, 2008 1:36:00 PM  

सही!!!
अनुप्रासाने एक सुरेख लय आणली आहेस.
’कुलुंगकुत्रे शेपुटवेड’ हे शब्दप्रयॊजन फारच आवडले.
सुरेख शब्द पण सहज प्रयोजन दोन्ही किती छान जमलय.

धन्यवाद!
तुझ्या या कवितेमुळे मी ही एक कविता अनेक वर्षांनी ब्लोगवर टाकली. मागच्या महीन्यात लिहीली होती. विषय सारखा वाटला मग एक निमित्त मिळाले लिखाण चालू करायला.

इतिBlogger prasad bokil
Thursday, April 10, 2008 8:13:00 PM  

mereko nahi awdya... ekdamach bore watya...

इतिAnonymous Anonymous
Thursday, April 17, 2008 9:14:00 PM  

khoop chaan lihili ahe. Hee kavitaa vachoon ekach line aathavoon gelee "The western wind was wild and dark with foam" . maraaTheetalyaa kavitaa kiti vegaLyaa asataat hyachi jaNeev parat ekdaa zaalee. malaa eke kaaLi vaaTaayache ki Shyeah, hya bhaashet rhyming kitee sope ahe, he tar cheating zaale! paN, haLu haLu maraaThee kavitaanmadhalee vegaLeech jaadu jaaNavalee. aaNee he lihistovar dheer dharalaa hotaa, paNa aattaa bhaaShaa badalaachi vinantee!

Hush! :) Seldom in English does one encounter that martial tone, the harsh and sonorous intonations, maybe the clamorous perorations which is one of the prized (by me, at least) hallmarks of Marathi poetry. Perhaps, you must have come upon similar usuage in your recent readings of Rilke and Goethe. Those alliterative Da, ba, Na, and Khas are stupendous. Perhaps, if you had been our highschool teacher, the class would have produced a few poets/ kavis.

इतिBlogger Nikhil
Friday, May 02, 2008 1:58:00 AM  

Having said that, I do not quite agree with the message. The weather here is absolutely marvellous. It is a happening thing, and summer does not mean 3 months of torrid heat, nor three months of monotonous rain. There is change, and unpredictability, which awakens a respect for the power of the elements. Who will ignore the radio warnings of tornadoes? Who will dare a forecast of a severe whiteout? On the Minneapolis Flickr site, they have a series, where they have time lapse photos of the same scene taken 3 months apart for one whole year. And, the places change beyond recognition. Moreover, each new picture shows one more enchanting side of that same location. And I day dream about a Parvati in Pune decked in fall colors in sept, followed by sledding down its white slopes a few months later and then climbing its slopes smelling with the tangy aroma of new unbroken buds in spring. Aren't we missing something, these changing sights of secretive nature? To end this meaningless rambling, the barren windy scene you describe is just another unique interregnum (not sure about the spelling), enjoy that portrait while you can. :)

इतिBlogger Nikhil
Friday, May 02, 2008 2:00:00 AM  

इतक्या सुंदर कविता करतेस मग त्यांना नावे(शीर्षक) का गं देत नाहिस?
तुझे सगळेच लेखन अतिशय आवडले.
शुभांगी

इतिBlogger Shubhangee
Tuesday, July 15, 2008 5:24:00 PM  

माती काळी: जणूं काजळी विझल्या चिलमीच्या तोंडावर
-ही प्रतिमा फार आवडली.
आजीने थरथर-हातांनी थोपटल्याचे स्वप्न पहावे!
-ही कल्पना सुरेख.

उत्तम कविता

इतिBlogger VijayN
Friday, March 13, 2009 5:19:00 PM  

Post a Comment

<< Home