पत्रावळ: १
( "आपण का नाही असं सजवून धजवून जेवण मांडत रोज?" या प्रश्नावर "बाळा, वेळ असता तर चिंचेच्या पानाच्या पत्रावळी केल्या असत्या" हे उत्तर वाचलं. वाटलं, वेळ असता तर..मुभा असती तर..जाणीव असती तर..वाचायला कुणी असतं तर..किती जणींनी किती पत्रांतून मन मांडलं असतं आपलं. त्या न लिहिल्या गेलेल्या पत्रांच्या या पत्रावळी.)
ए, तसं रोजच बोलतो आपण फोनवर. पण आत्ता पत्र लिहिल्याशिवाय राहावतच नाहीये. आत्ता म्हणजे अगदी आत्ताच तुला सांगायचीय एक जम्मत..आणि तू तिकडे रात्रभर झालेल्या झोपेच्या खोबर्यात थोडी पहाटेची साखरझोप कालवता येतीय का ते बघत असणार. 'जागरणं करू नको' असं तुला सांगणं म्हणजे पंचाईत. 'माईल्स टू गो बिफोर आय स्लीप' वाल्या रॉबर्ट फ्रॉस्टपासून 'या निशा सर्वभूतानां' वाल्या गीतेपर्यंत सगळ्यांचे दाखले तू देत बसणार. (कधीकधी मुद्दाम तुझ्या तोंडून ते सगळं ऐकायला मी तुला पीळ मारते, हे तुला ठाऊक आहेच. आपण ना, एक आत्मसंतुष्ट दुक्कल आहोत.) जी काही झोप मिळतेय तिच्यात तरी स्वप्नं बघत बसू नकोस. अजून म्याड होशील नाहीतर.
वा!. नेहमीसारखीच अघळपघळ सुरुवात केल्यावर कसं बरं वाटलं. तुलाच चुकल्या-चुकल्यासारखं झालं असतं, थेट मुद्द्यावर आले असते तर.
पण मला तुला थोडक्यात सांगायचंय ते हे: आपलं पिल्लू मोठं झालंय रे आता..आज कचकन एका क्षणात जाणवलं मला.
आज सकाळपासून काहीतरी बिनसलं होतं माझं. एक काम धड होईना. पाड्यावरचया शाळेचा तो एक तिढा सांगितला होता ना तुला..कृष्णा 'मी जातो शिकवायला' म्हणाला त्याच्या भरवश्यावर होते मी..टोणग्याने नदीत पोहाणी मारताना खोक पाडून घेतली डोक्याला. अरे हो, मुद्दाम 'पाडून घेतली' असं नाही. कळलं. चूक झाली. तू आता मध्ये मध्ये अडवू नको हां..लिहायला त्रास होतो मग मला. तर अर्धा दिवस पोराला दवाखान्यात घेऊन जा, तूप-मेतकूट-पेज खायला घाल..त्या सगळ्यात गेला. दुपारी रेवा सांगत आली..नव्या वासराचं लक्षण ठीक दिसत नाही म्हणून. हे चौथं , गेल्या आठवड्याभरात! पाण्यातून काहीतरी जातंय का बघितलं पाहिजे.
हंऽऽ. तर काही ना काही किटकीट चालूच होती डोक्यामागे. जरा स्वस्थ बसून विचार करावा म्हणून पडवीतल्या भिंतीला टेकून बसले. तेवढ्यात स्वैपाकघरातून खणखणाट ऐकू यायला लागला जोरजोरात. एक बादली उपडी टाकून टिंबूराजे थाटात बसलेले. समोर घंगाळ आणि दोन पातेली. हातातल्या रवीने ठाण ठाण बडवत सुटली होती स्वारी - मोठ्ठा वादक असल्याच्या थाटात. एरवी मी पण आशा भोसले असल्यागत गात सुटले असते त्याच्या तालावर..पण आज..चिडू नको..मी ओरडले त्याच्या अंगावर जोरात.
पुढे ऐक ना काय झालं.
माझा हात पकडून म्हणतो, 'आवली तुला कुठे दुखतं?'
मला कळेच ना, हे असं काय विचारतोय. मग तोच पुढे म्हणाला..'आवली, मी नाऽ..विचार केलाय बरं का नीट. (हा दुपट्यातला बोकोबा. 'विचार केलाय' म्हणे!) तू ओरडतेस ना, तेव्हा रागावलेली नसतेसच खरं म्हणजे. तुला कुठेतरी दुखत असतं गं. मग थोड्या वेळानं तू बाबाला फोन करतेस, तो तुला काहीतरी सांगून हसवतो, आणि तू बरी होतेस मग! पण आत्ता तर बाबाकडे रात्र आहे ना..तो कसा बोलणार तुझ्याशी? म्हणून म्हणतो, मला सांग कुठे दुखतं..मी बरं करतो तुला.'
डोळ्यात पाणी आलं भानू माझ्या.
माझी काळजी घ्यायला लेक मोठा झालाय हो आता. (आता 'मनूवादी' म्हणत चेष्टा केलीस तर दणके बसतील!)
त्याची काळजी घ्यायला लवक्कर इथे येशील?

8 Comments:
पत्राचं उत्तर लिहीलं तर चालेल?
फार गोड आहे गं! पुढल्या पत्रावळींची वाट बघतीये. नियमीत लिही आता :)
suruvat chhan zaliy gayatri, pudhalya bhaganchi vaaT pahto.
hey!!
What a nice concept. =)
You are truly gifted. :)
प्रियानी आत्ता सांगितले की तू नवीन पत्रावळ मांडली आहेस! सुंदर! (आता यात काय नवीन?)
सुरेख.
mastach! :)
waah...
pudhchi patra kdhi?
Post a Comment
<< Home